Advertisement

नवी मुंबई मेट्रोने गाठला अडीच महिन्यात 10 लाख रायडरशिपचा टप्पा

तसेच या कालावधीत 2.55 कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे.

नवी मुंबई मेट्रोने गाठला अडीच महिन्यात 10 लाख रायडरशिपचा टप्पा
SHARES

बहुप्रतिक्षित नवी मुंबईतील पहिल्या मेट्रोला सुरुवात झाल्यापासून लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे. अवघ्या 2.5 महिन्यांत, मेट्रोने दशलक्ष प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. ज्यामुळे या कालावधीत 2.55 कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे.

अहवालानुसार, मेट्रो सुरू झाल्याच्या पहिल्या दोन आठवड्यात 2.23 लाख प्रवाशांनी प्रवास केला, त्यामुळे नोव्हेंबरमध्ये तिकीटाची कमाई 57.52 लाख झाली. डिसेंबरमध्ये 3.77 लाख प्रवाशांनी मेट्रोच्या तिकिटांसाठी 1.06 कोटी रुपये भरले.

जानेवारीमध्ये 3.35 लाख प्रवाशांनी प्रवास करून संख्या थोडीशी कमी झाली, परिणामी 91.72 लाख महसूल मिळाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जानेवारीचे शेवटचे दोन दिवस विचारात घेऊन ही आकडेवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

नवी मुंबई मेट्रो सेवेला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबई मेट्रो सेवा 17 नोव्हेंबरपासून सुरू झाल्यापासून जानेवारी अखेरपर्यंत एकूण 9,34,728 प्रवाशांनी प्रवास केला आहे. एकूण उत्पन्न 2,55,02,177 इतके आहे, असे सिडकोच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मेट्रो मार्गामुळे प्रदेशातील रिअल इस्टेटच्या किमतीही वाढल्या आहेत.

मेट्रो दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 65 अप आणि 65 डाऊन सेवा चालवते. दर 15 मिनिटांनी मेट्रो रेल्वे सेवा आहे. येत्या काही महिन्यांत प्रवासी वाहतूक आणखी वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.

महिन्यानुसार महसूल (डिजिटल आणि रोख) आणि रायडरशिप:

नोव्हेंबर 2023 - 2,22,996 रायडरशिप

महसूल - (16,47,721 - 41,04,348 = 57,52,069)

डिसेंबर 2023 - 3,76,810 रायडरशिप

महसूल - (34,76,866 – 71,01,393 = 1,05,78,259)

जानेवारी 2024 - 3,34,922 रायडरशिप

महसूल - (33,68,951 - 58,02,898 = 91,71,849)

एकूण: 9,34,728 रायडरशिप

महसूल - (84,93,538 – 1,70,08,639 = 2,55,02,177)



हेही वाचा

दिवेघाटाची वाट सुखकर होणार

ठाणे-कसारा आणि ठाणे-कर्जत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा