Advertisement

नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर अभय योजनेला १ मार्चपर्यंत मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती.

नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर अभय योजनेला १ मार्चपर्यंत मुदतवाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून १५ डिसेंबर २०२० ते १५  फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची मुदत आता वाढवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभय योजनेस १ मार्च २०२१ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. ५ डिसेंबर २०२० ते १५  फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के पर्यंत सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अभय योजना जाहीर करण्यात आली होती.

अभय योजनेअंतर्गत १५ फेब्रुवारी पर्यंत ९७ कोटी ८८ लाख इतकी रक्कम प्रत्यक्ष जमा झालेली असून अभय योजनेचा लाभ घेताना नागरिकांना ५२ कोटी ३० लाख रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची सूट मिळालेली आहे. अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा अशी विनंती केली जात होती. या पार्श्वभूमीवर अभय योजनेस १५ दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

 १ मार्चपर्यंत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रक्कमेवर ७५  टक्के सूट मिळणार आहे. नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा असं आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.



हेही वाचा -

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा