Advertisement

फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाला नवी मुंबई पालिकेची नोटीस

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने शिफारस केलेला एकही कोविड किंवा नॉन कोविड रुग्ण फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने दाखल करुन घेतला नाही.

फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाला नवी मुंबई पालिकेची नोटीस
SHARES

कोरोनाचे रुग्ण दाखल करून न घेतल्याने नवी मुंबई महापालिकेने वाशी येथील फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने शिफारस केलेला एकही कोविड किंवा नॉन कोविड रुग्ण  फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने दाखल करुन घेतला नाही. रुग्णालयाने पालिकेबरोबर केलेल्या कराराचा भंग केल्याने ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

नवी मुंबईला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून यासाठी नवी मुंबई पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयातील एक लाख वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळ हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. या वैद्यकीय कंपनीला २५ वर्ष नाममात्र भाडय़ाने दिले आहे. त्या बदल्यात या रुग्णालयाने शहरातील वर्षाला ८०० गरीब गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा करार केला आहे. मात्र या रुग्णालयाने मागील नऊ महिन्यांत एकाही रुग्णावर उपचार केला नाही. त्यामुळे पालिकेने रुग्णालयाला ही नोटीस पाठवली आहे.

या रुग्णालयासाठी सार्वजनिक रुग्णालयाचा एक भाग देताना शहरातील गरीब व गरजू रुग्णाांना दहा टक्के रुग्णशय्या उपलब्ध करून देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार पालिकेचा आरोग्य विभाग शिफारस करणाऱ्या गरजवंत रुग्णाला फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयात औषधे वगळता मोफत सेवा दिली जाते. मात्र मार्चपासून सुरू झालेल्या कोविड साथरोगानंतर फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने पालिकेने शिफारस केलेल्या एकाही रुग्णाला दाखल करून घेतलेले नाही. 



हेही वाचा -

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

कांदिवलीत बारवर कारवाई, आॅर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांकडून अश्लील कृत्य



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा