Advertisement

नवी मुंबई अग्निशमन दलात ५ फायर बाईक दाखल

नवी मुंबईत अग्निशमन विभागानं फायर बाईक आपल्या दलात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

नवी मुंबई अग्निशमन दलात ५ फायर बाईक दाखल
SHARES

नवी मुंबईत अग्निशमन विभागानं फायर बाईक आपल्या दलात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या फायर बाईकमध्ये पाण्यासोबतच 'वॉटर मिस' हे नवीन तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्यापेक्षा दहा पट जास्त प्रभावशाली आहे.

अडचणींच्या भागात आगीवर नियंत्रण मिळवणं सहज शक्य होणार असल्याचं नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहन अपघातात तसंच वाहनांमध्ये अचानक लागेल्या आगीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दलाची मोठी गाडी पोहचण्यास विलंब लागतो. अशावेळी ही फायर बाईक ती वाहतूक कोंडी भेदत घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवेल.

सध्या पाच फायर बाईक अग्निशमन विभागात दाखल झाल्या असून त्या वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ, सीबीडी या अग्निशमन केंद्रात प्रत्येकी एक अशा ठेवण्यात आल्या आहेत. पुढे गरजेनुसार यात वाढ होणार आहे. 'रॉयल एनफिल्ड हिमालयीन 350' या कंपनीच्या या बाईक्स आहेत.

पाच ही बाईक्सची नोंदणी फायर बाईक्स म्हणून करण्यात आली आहे. 411 CC याची इंजिन क्षमता असून या बाईकला ५ गियर आहेत. पेट्रोलवर चालणारी ही बाईक BS- 6 या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहेत तर याला I-CAD ने मान्यता दिलेली आहे. पाणी आणि पेट्रोल मुबलक प्रमाणात असल्यास ही बाईक बिना व्यत्यय अग्निशमनाची सुविधा नागरिकांना देऊ शकते.


फायर बाईक्सची वैशिष्ट्ये

  • या फायर बाईक्सवर ४० लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत.
  • १०० बार प्रेशरनं आग विझवू शकते. सोबतच पाण्याच्या टाकीत फोमचा वापर करून आग आटोक्यात आणता येते.
  • सदर फायर बाईकचा १५ ते २० मीटरपर्यंत जेट असून 20 मीटरपर्यंत आग आटोक्यात आणू शकतो.
  • विमानतळावर जसे चालू विमानावर आगीवर नियंत्रण मिळवता येते त्याच प्रकारे चालू गाडीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याची 'रोझंबर' पद्धतीनं आगीवर नियंत्रण मिळवता येते.
  • या फायर बाईक्सवर दोन अग्निशमन कर्मचारी असतात. त्यापैकी एक ऑपरेटर आणि एक चालक.
  • या बाईक्सवर सायरन आणि अग्निशमन दलाचा दिवा बसवण्यात आल्यानं वाहतूक कोंडीतून सहज मार्ग काढत घटनास्थळी विनाविलंब सहज पोहचू शकते.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा