Advertisement

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई पालिकेचं २०६ स्वयंसेवकांचं पथक रवाना

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर बारीक लक्ष असून ते सर्व बाबींचा नियमित आढावा घेत आहेत. या मदतकार्याच्या नियंत्रणासाठी नियुक्त नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे पूरग्रस्त भागातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई पालिकेचं २०६ स्वयंसेवकांचं पथक रवाना
SHARES

कोकण व इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीतून तेथील जनजीवन सावरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने तत्पर कार्यवाही केली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आवश्यक साधनसामुग्री व वाहनांसह मदतकार्य पथके तसेच औषधसाठ्यासह वैद्यकीय पथके तेथील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार त्वरित रवाना केली आहेत.

नवी मुंबई महापालिकेने 24 जुलै रोजी 43 जणांचे व 25 जुलैला 20 जणांचे मदतकार्य पथक महाडला तसंच 26 जुलैला 40 जणांचे मदतकार्य पथक कोल्हापूरला पाठवलं आहे.   स्वच्छता साधनांसह कार्बेलिक पावडर, ब्लिचींग पावडर तसंच कोव्हीडच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशकाच्या स्प्रेईँग टीमसह ही पथके पाठविण्यात आली आहेत. याशिवाय 25 जुलैला डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफसह 15 जणांचे वैद्यकीय पथक चिपळूणला व 27 जुलैला 24 जणांचे वैद्यकीय पथक महाडला मोठ्या प्रमाणात औषधसाठ्यासह पाठविले आहे. 

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर बारीक लक्ष असून ते सर्व बाबींचा नियमित आढावा घेत आहेत. या मदतकार्याच्या नियंत्रणासाठी नियुक्त नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे पूरग्रस्त भागातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत. त्या अनुषंगाने चिपळूणमधील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार 206 स्वयंसेवकांची आणखी दोन जम्बो मदतकार्य पथके चिपळूणकडे रवाना करण्यात आलेली आहेत. या पथकासोबत 2 फायर टेंडर व 6 बसेस आणि 3 जीप रवाना झालेल्या आहेत.

याआधी 31 जुलै रोजी 40 स्वयंसेवकांचे मदतकार्य पथक स्वच्छता साहित्य व कोव्हीडच्या अनुषंगाने जंतुनाशक फवारणी  साहित्यासह महाड व चिपळूणमधील मदतकार्यासाठी रवाना झाले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बालाजी ठाकूर व डॉ. तेजस थोरात हे महानगरपालिकेचे आणि डॉ. मोहित भोसले व डॉ. मोइद्दीन अहमद हे तेरणा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश असलेले 15 जणांचे वैद्यकीय पथक औषधसाठ्यासह 31 जुलै रोजीत महाड व चिपळूण येथे रवाना झालेले आहे. 

या दोन्ही पथकांनी महाडमध्ये आपले काम सुरू केले असून हे पथक पुढे चिपळूणलाही जाणार आहेत. या पथकांसोबत 2 बसेस, 2 जीप, 2 रूग्णवाहिका, वॉशींग टॅंकर, प्रेशर वॉशींग टॅकर अशी वाहने पाठविण्यात आलेली आहेत.

या मदतकार्य व वैद्यकीय पथकांप्रमाणेच पूरामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी आवश्यक वाहनेही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी पाठविण्यात आलेली आहे. महाड भागात 1 जेसीबी, 3 टँकर, 3 मिनी टिपर, 1 डम्पर कार्यरत आहे, याशिवाय कोल्हापूर भागात 1 सक्शन युनीट कार्यरत आहे.

 31 जुलैला महाड - चिपळूणसाठी रवाना झालेल्या मदतकार्य पथकासोबत 1 वॉशींग टॅंकर, 1 प्रेशर वॉशींग टॅंकर, 2 सक्शन युनीट पाठविण्यात आलेली आहेत. याशिवाय 1 सक्शन युनीट इचलकरंजी भागात पाठविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तिन्ही वैद्यकीय पथकांसोबत रूग्णवाहिका तसेच औषधसाठ्यासह मेडिसीन वाहन पाठविण्यात आलेले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा