नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (एनएमएमटी)ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. यामुळे, ते मोफत बस प्रवास पाससाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात. एनएमएमसीच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त एनएमएमसी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी जाहीर केलेल्या या उपक्रमाची उद्दिष्ट वृद्ध प्रवाशांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आहे.
पूर्वी, ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि त्यांचे स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी जवळच्या एनएमएमटी पास केंद्र किंवा तुर्भे डेपोला भेट द्यावी लागत असे. एनएमएमटी बस ट्रॅकर अॅपवर उपलब्ध असलेल्या या नवीन ऑनलाइन सुविधेमुळे, ते आता घरबसल्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
अर्ज करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि 50/- रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर स्मार्ट कार्ड पोस्टाद्वारे पाठवले जाईल.
"आम्हाला सोसायटीत वॉचमन म्हणून काम केल्यामुळे कार्ड काढण्यासाठी डेपोमध्ये जाण्याची वेळ मिळत नाही. आमच्यासारख्या लोकांसाठी हा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे. हे अॅपद्वारे उपलब्ध करून दिल्याने आता ते सोयीचे होईल. मी कामासाठी दररोज उलवे ते नेरुळ असा प्रवास करतो आणि आता मी एनएमएमटी वापरून मोफत प्रवास करू शकतो," असे 62 वर्षीय वॉचमन मनोहर शिंदे म्हणाले.
हेही वाचा