SHARE

मुंबईतील कफ परेड येथील समुद्रातील ३०० एकर जागेत मातीचा भराव टाकून त्या ठिकाणी उद्यान बनवण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केला.  या उद्यानासाठी टाटा कन्सल्टन्सी यांची सल्लागार म्हणून निवड केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढं मंजुरीला आहे. याविरोधात गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय येथे आंदोलन करण्यात अाले.  यावेळी मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, महापालिका गटनेत्या राखी जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्यानाला विरोध करूया, मुंबईकरांवरील संकट वाचवूया, बिघडवू नका पर्यावरण नाहीतर होईल मुंबईचे मरण,  मेट्रोसाठी समुद्राला मूठमाती देऊ नका, समुद्र वाचवा, मच्छिमार वाचवा, मुंबई वाचवा, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांनो निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही असे फलक झलकावून राष्ट्रवादी काँग्रेसने कफ परेडच्या समुद्रात होऊ घातलेल्या उद्यानाला जाहीर विरोध दर्शवला.


जनआंदोलनाचा इशारा 

समुद्र बुजवून भविष्यात मुंबईकरांना त्सुनामीच्या तोंडी देण्याच्या हा प्रयत्न अाहे. एका बाजूला महापालिका पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडं समुद्रात भराव टाकून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्याचा आरोप करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा याविरोधात जनआंदोलन तीव्र केलं जाईल, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला. 

विकास आराखड्यात समुद्राच्या जागेत या उद्यानाचं आरक्षण टाकलं आहे. त्यामुळे हे आरक्षण त्वरित काढून टाकलं जावं आणि हा प्रस्ताव रद्द केला जावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.हेही वाचा - 

झाडांच्या कत्तलीवरून दादरमध्ये पर्यावरणवादी अन् पालिकेत जुंपली

ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या