Advertisement

ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या


ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या
SHARES

मुस्लीम बांधवांचा पावित्र सण रमजान ईद आणि दुसऱ्या दिवशी साजरी होणारी बासी ईद यानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर व उपनगरात १४२ जादा बस सोडण्यात येणार आहेत. बासी ईद दिवशी मुस्लीम बांधवाची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेत बेस्टने रविवार दि. १७ जून रोजी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


या क्रमांकाच्या असतील बस

बसमार्ग क्रमांक ३, ४ मर्या., ७ मर्या., ८ मर्या., २१ मर्या., २२ मर्या., २८,३० मर्या., ३३, ३७, ३९, ४५, ५९, ६३, ६७, सी-७१ जलद, ७७, ८६, ८७ मर्या.,
८८, १०८, १११, १२४, १२५, १३४, १६६, १८०, २०३, २११, २२४, २३१, २४१, २५६, २६९, २७१, २७२, २७३, ३०२, ३०३, ३०५, ३१७, ३२६, ३५५ मर्या., ३५७, ३६७, ३७६, ३९६ मर्या., ४०८, ४२२, ४९६ मर्या., ५०१ मर्या., ५२१ मर्या., ५२४ मर्या., ५३३ मर्या., ५४५ मर्या., ७०० मर्या., ७०६ मर्या., ७१८ मर्या.


एकूण १४२ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व बसगाड्या दुपारी २ नंतर सोडल्या जातील. तसंच गरज लागल्यास आणखी बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल, असं बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.हेही वाचा-

वाळूच्या वादळामुळं मुंबई - चंदीगढ विमान दिल्लीला उतरवलं

मुंबई ते बाली समुद्रप्रवास लवकरच


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा