Advertisement

वाळूच्या वादळामुळं मुंबई - चंदीगढ विमान दिल्लीला उतरवलं


वाळूच्या वादळामुळं मुंबई - चंदीगढ विमान दिल्लीला उतरवलं
SHARES

एअर इंडियाचं मुंबई ते चंदीगढ जाणारं विमान वाळूच्या वादळामुळं अाप्तकालीन परिस्थितीत दिल्ली विमानतळावर उतरवण्यात अालं. चंदीगढ शहरात मोठ्या प्रमाणावर वाळू पसरून कमी  दृश्यमानता तयार झाल्यानं विमान चंदीगढ विमानतळावर उतरवण्यास परवानगी नाकारण्यात अाली.  दरम्यान, चंदीगढला जाणारी सर्व विमानं रद्द करण्यात अाली अाहेत. 


राजस्थानातून वादळ 

राजस्थानमधून अालेल्या वाळूच्या वादळानं उत्तर अाणि उत्तर - पश्चिम भाग प्रभावीत झाला अाहे. दिल्लीलाही या वाळूच्या वादळाचा फटका बसला अाहे. मात्र, विमानाला अाणखी विलंब अाणि ते रद्द करता अालं नसतं. त्यामुळं मुंबईहून चंदीगढला जाणारं हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात अालं.


प्रदुषण वाढलं

राजस्थानमध्ये सुरू झालेलं हे वाळूचं वादळ अाता देशाच्या उत्तर अाणि उत्तर - पश्चिम भागात गेलं अाहे.  या वादळामुळं उत्तर भारतातील शहरांमध्ये प्रदुषणाची पातळी वाढली.  विशेषकरून दिल्लीमध्ये प्रदुषण धोक्याच्या पातळीवर पोहोचलं अाहे. 



हेही वाचा - 

मुंबई ते बाली समुद्रप्रवास लवकरच

मराठी नाट्य संमेलनासाठी विशेष रेल्वे गाड्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा