Advertisement

कळव्यातील राष्ट्रवादीच्या रेल रोको आंदोलनाचा पचका


कळव्यातील राष्ट्रवादीच्या रेल रोको आंदोलनाचा पचका
SHARES

एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या घटनेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनेही संताप व्यक्त केला आहे.

रेल्वे प्रशासनाचा निषेध आणि बुलेट ट्रेनला विरोध करण्यासाठी कळवा रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रेल रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी 2 मिनिटापर्यंत रेल्वेलाईन अडवून ठेवली होती. 

ऐन गर्दीच्या वेळी या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसू नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवले. यावेळी राष्ट्रवादीचे मोजकेच कार्यकर्ते ट्रॅकवर उतरले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनकर्ते स्थानकाबाहेर निघून गेले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.


हेही वाचा - 

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: जखमी मुलीला पाहून आईनेही धरली रुग्णालयाची खाट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा