Advertisement

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: जखमी मुलीला पाहून आईनेही धरली रुग्णालयाची खाट


एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: जखमी मुलीला पाहून आईनेही धरली रुग्णालयाची खाट
SHARES

एल्फिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत  २३ जणांचा मृत्यू झाला. तर ३८ जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकीच एक रुग्णालयात उपचार घेणारी रेश्मा कदम.

दिव्याला राहणाऱ्या रेश्माने शुक्रवारी नेहमीप्रमाणे परळच्या दिशेने ट्रेन पकडली. १०.१५ वाजता रेश्मा परळ स्टेशनला उतरली आणि त्या चेंगराचेंगरीत जखमी झाली. त्यावेळी नेमके काय झाले, ते कोणालाच कळले नाही. फक्त सर्वजण आरडाओरडा करत होते. पावसात भिजू नये म्हणून अनेकांनी एल्फिन्स्टनच्या पुलाचा आसरा घेतला. पण, पसरलेल्या अफवेमुळे स्वत:चा जीव वाचवण्याच्या नादात अनेक जण मृत्यूमुखी पडले तर, काही जखमी झाले.

रेश्मा आणि रेश्माच्या आई यांच्यात फक्त एका गाडीचाच फरक होता. रेश्मा आणि तिची आई आंबेडकरनगर इथल्या एकाच बिल्डिंगमध्ये काम करतात. आईला उशीर झाल्याने रेश्मा पुढे गेली. पण, ही घडलेली घटना जेव्हा रेश्माच्या आईला कळली तेव्हा त्या रेश्माला बघायला केईएममध्ये दाखल झाल्या. पण आपल्या मुलीला जखमी अवस्थेत पाहून त्या जागीच बेशुद्ध होऊन कोसळल्या. त्यांना देखील उपचारांसाठी केईएममध्ये दाखल करण्यात आले. रेश्माच्या पाठीच्या कण्याला मुकामार बसला आहे. तिच्यावर अजूनही केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मी मध्येच अडकले होते. खालीही उतरता येत नव्हते आणि वर चढता देखील येत नव्हते. पूर्ण ब्रिज आधीच भरला होता. माझ्या मागे असलेले अनेक प्रवासी माझ्यावर पडले. माझ्यासोबत काही मैत्रिणी देखील होत्या. त्या कुठे गेल्या कळालेच नाही. माझ्या पाठीची बॅग मी पुढे लावली होती त्यामुळे मला आधार मिळाला.

- रेश्मा कदम, जखमी


हेही वाचा - 

छत्री न नेल्यामुळे घडली दुघर्टना?

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: फुलासारख्या पोराचा जीव गेला, दुसरा कोमेजला



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा