Advertisement

छत्री न नेल्यामुळे घडली दुघर्टना?


छत्री न नेल्यामुळे घडली दुघर्टना?
SHARES

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या दुघर्टनेची वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत. त्यापैकी एक कारण पावसाचे सांगितले जात आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस नेमका पाऊस पडला आणि छत्री नसल्याने भिजू नये म्हणून प्रवाशांनी पुलावरील जिन्याचाच आसरा घेतला. मात्र हाच आसरा गर्दी होण्यास कारणीभूत ठरला. त्याचेच पुढे चेंगराचेंगरीत रुपांतर होऊन २२ प्रवाशांचा जीव गेला.

कुणी म्हणते शॉर्टसर्किटची, तर कुणी म्हणते पूल कोसळण्याच्या अफवेने प्रवाशांची पळापळ झाली. परंतु या दोन्हीही अफवा ठरल्या. एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलाला गर्दीची सवय आहे आणि प्रवाशांनीही. या पुलावर चेंगराचेंगरी होत नाही, असा एकही दिवस नसतो. परंतु शुक्रवारच्या दुर्घटनेला पाऊस आणि पुलावर आसरा घेणारे प्रवासी जबाबदार असल्याचे कारण पुढे येत आहे.


पश्चिम रेल्वेनेही या दुर्घटनेला पाऊस जबाबदार असल्याचे कारण दिले आहे. अहवाल वाचा



प्रवासी जिन्यावरच थांबले

एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार सकाळी साडे नऊच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांनी भिजण्याच्या भीतीमुळे पुलावरील जिन्यावरच थांबण्याचा निर्णय घेतला. छत्री नसल्यामुळे मागून येणारे प्रवासीही पुलावर थांबत गेले. परिणामी जिन्यावर पुलाच्या वरपर्यंत गर्दी वाढत गेली.


मागून येणाऱ्यांनी गर्दी वाढवली

एका बाजूला एल्फिन्स्टन रोड आणि परळ स्थानकावर गाड्या दाखल होत होत्या. त्यामुळे एकाच वेळी प्रवाशांची संख्या वाढत होती. परंतु पुलाच्या जिन्यावर प्रवाशांनी मार्ग अडवून ठेवल्यामुळे मागून येणाऱ्या प्रवाशांची पुलावर मोठी गर्दी झाली. जिने मोकळे असते, तर गर्दी झाली नसती आणि गर्दी झाली नसती, तर दुर्घटना टळली असती, असे प्रत्यक्षदर्शी श्रीकांत विचारे यांनी सांगितले. घटनास्थळी असलेल्या श्रीकांत विचारे या दुघर्टनेतून थोडक्यात बचावले.

ते सांगतात, मी जेव्हा कार्यालयात निघायला म्हणून या पुलाजवळ पोहोचलो, तेव्हा संपूर्ण जिना गर्दीने भरलेला होता. पुलावर चढणे शक्यच नव्हते. एवढेच काय आतल्या प्रवाशांनाही बाहेर येता येत नव्हते. छत्री न आणल्यामुळे पावसाच्या भीतीमुळे हे सर्व प्रवासी जिन्यावर थांबले होते. पण त्यांना मागून येणाऱ्या प्रवाशांची कल्पना नव्हती. लोकांना पुलावरून बाहेर पडायचे होते. पण हा प्रवेश मार्गच बंद झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. पाऊस पडला नसता, तर कदाचीत ही दुर्घटना टळली असती.



हेही वाचा -

येस… आय अॅम गिल्टी!

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: ‘या’ ६ हातांनी वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा