राणी लक्ष्मीबाई उद्यानात पक्षांसाठी घरकुल

Sion
राणी लक्ष्मीबाई उद्यानात पक्षांसाठी घरकुल
राणी लक्ष्मीबाई उद्यानात पक्षांसाठी घरकुल
See all
मुंबई  -  

पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी सायन येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानात पक्षांसाठी घरटी लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 500 घरटी उद्यानातील झाडांवर लावण्यात आली. यासाठी जानेवारीपासून सुरू असलेल्या माटुंगा येथील आठवडी बाजारात आलेल्या लहान मुलांकडून ही घरटी सजवून घेण्यात आली.

यावेळी राजेश शिरवाडकर (दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री) यांच्यासह विभागातील पर्यावरण प्रेमींनी हजेरी लावली होती. आठवडी बाजारात राबवल्या गेलेल्या घरटी रंगवण्याच्या उपक्रमाचा चांगला उपयोग हा पक्षांसाठी पर्यावरण दिनानिमित्त झाला याचा आनंद आहे, असे राजेश शिरवाडकर यावेळी म्हणाले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.