Advertisement

Coronavirus Updates: धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या १३८वर

धारावीत रविवारी २० नवीन रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus Updates: धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या १३८वर
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून धारावीत रविवारी २० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं येथील रुग्णसंख्या १३८वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावी परिसरात दररोज १५ ते २० कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.

धारावीत रुग्णांच्या संख्येनं १०० चा आकडा पार केल्यानं येथील ३४ बाधित क्षेत्रांमध्ये संशयित रुग्णांना शोधण्याची मोहीम तीव्र केली आहे. तसंच, या परिसरात भीतीचं व तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कल्याण वाडी, मुस्लीम नगर, मदिना नगर, मुकुंद नगर, सोशल नागर ही ५ ठिकाणं धारावीतील हॉटस्पॉट ठरली आहेत. या बाधित परिसरांना सील केल्यामुळं तब्बल ५० हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

धारावीतील कल्याण वाडी, मुकुंद नगर, शक्ती नगर, राजीव गांधी चाळ, नाईक नगर या परिसरातून रविवारी २० नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने धारावी परिसरात मिशन धारावीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, फिवर कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्पच्या अंतर्गत ११ ते १८ एप्रिल २०२० या काळात ४० हजार लोकांची तपासणी करण्यात आली. पालिकेची १७ आणि २४ डॉक्टरांची पथके येथे कार्यरत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा