Advertisement

मुंबईतील कोरोनाची लाट ओसरतेय

मुंबईतत गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेला कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव आता हळूहळु कमी होऊ लागला आहे.

मुंबईतील कोरोनाची लाट ओसरतेय
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी लसीकरण केलं जात आहे. कोरोनाला संपवण्यासाठी लसीकरण हाच जालीम उपाय मानला जात आहे. सध्या मुंबईत विक्रमी लसीकरण सुरू असून, याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. कारण, मुंबईतील कोरोनाचा आकडा १०००च्या खाली आला आहे.  

मुंबईतत गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेला कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव आता हळूहळु कमी होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी कमी झालेला कोरोना पुन्हा फेब्रुवारीत वाढला. तसंच, मुंबईत (Mumbai) कोरोनाची दुसरी लाट आल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं. मात्र, ही लाट ओसरत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे. 

बुधवारी मुंबईमधील नव्या रुग्णांची संख्या बरेच दिवसांची एक हजारच्या खाली आली. दिवसभरात ९५३ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ९० हजार ८८९ वर पोहोचली. मात्र, दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा १४ हजार ३५२ वर पोहोचला.दिवसभरात २ हजार २५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं आतापर्यंत ६ लाख ४१ हजार ५९८ रुग्णांनी कोरोनाला हरवले. त्यामुळे मुंबईत सध्या ३२ हजार ९२५ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या

  • 08 मे- 2678
  • 09 मे- 2403
  • 10 मे- 1794
  • 11 मे- 1717
  • 12 मे- 2116
  • 13 मे- 1946
  • 14 मे- 1657
  • 15 मे- 1447
  • 16 मे- 1544
  • 17 मे- 1240
  • 18 मे- 953



हेही वाचा -

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा