Advertisement

मुंबई विमानतळाच्या T2 जंक्शनवरील नवीन उड्डाणपूल 'या' आठवड्यात सुरू होणार

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वरील वाहतूक कोंडी आणि T1 डोमेस्टिक टर्मिनल जंक्शनवरील पीक अवर ट्रॅफिक यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई विमानतळाच्या T2 जंक्शनवरील नवीन उड्डाणपूल 'या' आठवड्यात सुरू होणार
SHARES

वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA) ने या आठवड्यात T2 विमानतळ जंक्शनवरील नवीन उड्डाणपूल उघडण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे.

यामुळे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वरील वाहतूक कोंडी आणि T1 डोमेस्टिक टर्मिनल जंक्शनवरील पीक अवर दरम्यानचे ट्रॅफिक कमी होण्याची अपेक्षा आहे.

नवीन उड्डाणपुलाला दोन मार्गिका आहेत. ते 8 मीटर रुंद असून त्याची लांबी 615 मीटर आहे.

नवीन उड्डाणपूल सध्याच्या उड्डाणपुलाला समांतर चालणार आहे. T2 वरून सहार एलिव्हेटेड रोडने येणारे वाहन चालक वांद्रेकडे जाताना T1 जंक्शनवर ट्रॅफिकमध्ये अडकतात.

उड्डाणपूल मुंबई विमानतळावरून वांद्र्याच्या दिशेने वाहतूक करेल. रहदारी कमी झाल्याने सिग्नलचा वेळ मर्यादित होईल. उड्डाणपुलाची रचना विमानतळाच्या फनेल झोनचा निकष ठेवून करण्यात आली आहे.

याशिवाय, पुढील आठवड्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते दक्षिण मुंबईपर्यंत प्रवासी नक्कीच सोयीस्करपणे, म्हणजे कमी रहदारीसह प्रवास करू शकतील. उड्डाणपुलाचे बांधकाम जून 2021 मध्ये 48.43 कोटी रुपयांच्या तात्पुरत्या खर्चाने सुरू झाले.



हेही वाचा

उत्तन-भाईंदर बससेवा भाईंदर जेट्टीपर्यंत वाढवण्याची मागणी

गोखले ब्रिजवर सध्या 'याच' वाहनांना परवानगी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा