गोरेगाव - ओशिवरा पश्चिम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी दुरुस्त करण्याचं काम नगरसेविका प्रमिला शिंदे यांच्या प्रयत्नानं होत आहे. स्मशानभूमीतली विद्युतदाहिनी जुनी झाल्यामुळे अनेक महिने बंद पडली होती. विद्युतदाहिनी असलेल्या इमारतीचा स्लॅबही कमकुवत होऊन काही ठिकाणी कोसळला होता. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रयत्नानं सीएनजी विद्युतदाहिनी सुरू करण्याचं काम, स्लॅबदुरुस्तीचं काम सुरू झालंय. 2 इलेक्ट्रिक विद्युतदाहिनी इमारतीचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. तसंच या ठिकाणी 20 ते 25 फुटांची चिमणीही बसवण्यात येतेय. प्रमिला शिंदे यांनी ही स्मशानभूमी सुसज्ज असेल, अशी ग्वाही दिली आहे.