Advertisement

लग्न समारंभात 'इतक्या' नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी

लग्न वगळता इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी देखील नियमावली जारी करण्यात आली आहे.

लग्न समारंभात 'इतक्या' नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी
SHARES

महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीत लग्न समारंभांपासून (Marriage) वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नवे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. सध्या लग्नांचा सिजन सुरू झाला आहे. पण नेमकं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

लग्न जर बंदीस्त हॉलमध्ये असेल तर तिथे उपस्थित नागरिकांची संख्या ही १०० पेक्षा जास्त असू नये. तसंच लग्न खुल्या जागेवर असेल तर तिथे २५० पेक्षा जास्त नागरिक असू नयेत. क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नागरिक असू नये, अशी नियमावली महाराष्ट्र सरकारकडून घोषित करण्यात आली आहे.

लग्न वगळता इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी देखील नियमावली जारी करण्यात आली आहे. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १००च्या वर नसेल. खुल्या जागेत ही संख्या २५०च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तेवढे नागरिक तिथे सहभागी व्हावेत, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनबाधितांचा आकडा १०० च्या पार गेला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग हा डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta variant) मानाने कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सावध झालं आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना काही महत्त्वपूर्ण सूचन दिल्या होत्या. यामध्ये गरज पडल्यास नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्याचे आदेश दिले होते.

केंद्राकडून मिळालेल्या या सूचनेनंतर लगेच मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) काल रात्रीची संचारबंदी जाहीर झाली. त्यानंतर उत्तर प्रदेश (UP) आणि हरियाणा (Haryana) या दोन राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला.

त्यापाठोपाठ गुजरातमध्ये (Gujrat) रात्रीची जमावबंदी आणि ८ शहरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडूनही रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीची (Section 144) घोषणा करण्यात आली.हेही वाचा

दुबईहून येणाऱ्यांसाठी ७ दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक

राज्यात रात्रीचे जमावबंदीचे आदेश लागू, काय आहेत इतर निर्बंध?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा