Advertisement

दुबईहून येणाऱ्यांसाठी ७ दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक

दुबईहून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी पालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

दुबईहून येणाऱ्यांसाठी ७ दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं शुक्रवारी कोविड-१९च्या ओमिक्रॉन प्रकारामुळे उद्भवलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दुबईहून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

एक आदेश जाहीर करून, पालिकेनं म्हटलं आहे की, दुबईहून मुंबईत परत येणाऱ्या मुंबईतील रहिवाशांना सातव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणीसह ७ दिवसांच्या होम क्वारंटाईनला जावे लागेल. अशा प्रवाशांना येताना RT-PCR चाचणी करावी लागणार नाही.

“दुबईहून येणारे सर्व प्रवासी जे मुंबईचे रहिवासी आहेत त्यांना होम क्वारंटाईन केलं जाईल. त्यांची सातव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल,” असं पालिकेनं सांगितलं.

मुंबई प्रशासकिय संस्थेनं सांगितलं की, जर चाचणीचे निकाल नकारात्मक आले तर असे प्रवासी त्यांच्या आरोग्याचे स्वत: ची देखरेख करतील. परंतु निकाल सकारात्मक असल्यास, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी पाठवलं जाईल.

दरम्यान, दुबईहून येणार्‍या प्रवाशांना जे महाराष्ट्राच्या इतर भागात राहत आहेत त्यांना सार्वजनिक वाहतूकिनं घरी जाण्याची परवानगी नाही. त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाईल, असं पालिकेनं आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.



हेही वाचा

राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा