या वाहनतळाचे टेंडर काढणार कधी?

 Kandivali East
या वाहनतळाचे टेंडर काढणार कधी?
या वाहनतळाचे टेंडर काढणार कधी?
See all

कांदिवली - महापालिकेने नवीन टेंडर न काढल्यामुळे कांदिवली (पू.) येथील ठाकूर कॉम्प्लेक्स जवळ असलेले महानगरपालिकेचे वाहनतळ बंद अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनं उभी कुठे करायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. महापालिकेने हे वाहनतळ मागील 1 वर्षापूर्वी आदर्श संस्था यांना चालवण्याकरता दिली होती. मात्र या संस्थेचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून अद्याप नवीन टेंडर काढण्यात आले नसल्यामुळे हे वाहनतळ बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. या वाहनतळात ठाकूर कॉम्प्लेक्स, पोयसर बिहारी टेकडी परिसरातले रहिवासी आपल्या गाड्या उभ्या करतात. मात्र नवीन टेंडर न काढल्यामुळे वाहनतळ बंद ठेवण्यात आले असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

यासंदर्भात आर. दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावसाहेब गायकवाड यांना विचारले असता येत्या सात दिवसात टेंडर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Loading Comments