Advertisement

ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम, ब्रेथ अॅनालायझरचा वापर

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत, लोक मोठ्या संख्येने उत्सव साजरा करण्यासाठी बाहेर पडतात.

ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम, ब्रेथ अॅनालायझरचा वापर
SHARES

मद्यपान करणाऱ्यांना आणि रॅश ड्रायव्हिंग रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी 29 डिसेंबरपासून ब्रेथलायझर मशिनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.  2020-21 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारामुळे ब्रेथलायझर बंद करण्यात आले होते. कारण या मशीनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका अधिक होता. 

2021 मध्ये, वाहन चालवताना वाहनचालकांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्त चाचण्या घेण्यात आल्या होत्या. कारण या मशीनचा वापर कोरोनामुळे बंद करण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा त्याचा वापर केला जाणार आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत, लोक मोठ्या संख्येने उत्सव साजरा करण्यासाठी बाहेर पडतात. पोलिसांनी सांगितले की, या वर्षी गर्दी जास्त होण्याची अपेक्षा आहे कारण कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. शिवाय, गेल्या दोन वर्षांत लोक घरीच होते. 

31 डिसेंबरच्या रात्री  मुंबईत वेगवेगळ्या अशाी 100 ठिकाणी नाकबंदी पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांबरोबरच वाहतूक पोलिसही संबंधित व्यवस्था करणार आहेत. कोणी दारू पिऊन किंवा बेदरकारपणे गाडी चालवताना आढळून आल्यास त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल.

मुंबई वाहतूक पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहिले आहे आणि बीअर बार, पब आणि वाईन शॉप्सना ‘मद्यपान करून वाहन चालवू नका’ असे फलक लावण्याचे आवाहन केले आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा व्यवस्था म्हणून शहरात 150 हून अधिक वाहतूक पोलीस अधिकारी आणि 2,000 कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहेत. वाहतूक सहपोलीस आयुक्त, चार पोलीस उपायुक्त आणि आठ सहाय्यक सीपी शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवतील.

जॉइंट सीपी (वाहतूक) प्रवीण पडवळ म्हणाले की, ट्रॅफिक पोलिसांना ब्रेथलायझर किट आधीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

31 डिसेंबर 2019 रोजी दारू पिऊन गाडी चालवण्याची प्रकरणे

७७८

३१ डिसेंबर २०२०

35

31 डिसेंबर 2021 रोजी दारू पिऊन वाहन चालविण्याविरोधी मोहीम

१८ 



हेही वाचा

Mumbai: नवीन वर्ष साजरे करताना 'ही' खबरदारी घ्या">COVID-19 In Mumbai: नवीन वर्ष साजरे करताना 'ही' खबरदारी घ्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा