Advertisement

वडपे ते ठाणे ८ पदरी मार्गासाठी १४ हेक्टर जंगल नष्ट होणार?

या रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यातील १४ हेक्टर जंगल नष्ट होण्याची शक्यता आहे.

वडपे ते ठाणे ८ पदरी मार्गासाठी १४ हेक्टर जंगल नष्ट होणार?
Representative image
SHARES

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची भिवंडी तालुक्यातील वडपे ते ठाणे शहर दरम्यानच्या चार पदरी कॅरेजवेला आठ पदरी मार्गावर अपग्रेड करण्याची योजना आहे.

या रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यातील १४ हेक्टर जंगल नष्ट होण्याची शक्यता आहे. NHAI या कारणास्तव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूकही सुरळीत होणार आहे.

त्यांनी या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला आहे. NHAI नं सांगितलं आहे की, त्यासाठी १४.६१३ हेक्टर (४१ एकर समतुल्य) वनजमीन लागेल. त्यासाठी ११०.४५ हेक्टर बिगर वनाच्छादित जागेची आवश्यकता असेल.

प्राधिकरणानं स्पष्ट केलं की वडपे ते ठाण्याकडे जाणार्‍या रस्त्यावर चौपदरी मार्ग बनवल्यापासून बरीच रहदारी होती. कारण हा रस्ता मुंबईला बायपास करून NH8, NH3, NH4, NH17 ला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

१९८४ मध्ये NHAI ने १३.९१ हेक्टर जमीन वळवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. तथापि, त्याच्या कोणत्याही नोंदी नाहीत.

NHAI ठाण्यातील बाळकुम ते गायमुख डीपी रोड बांधण्यासाठी १० हेक्टर खारफुटीचे जंगल साफ करण्यासाठी मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. हे NH-3 कनेक्टर असल्याचे सांगितले जाते.



हेही वाचा

ट्राफिकमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार, 'हे' आहे कारण

पवई तलावाजवळील सायकल ट्रॅक प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा