Advertisement

कार्ड क्लोनिंग मागे नायझेरियन टोळीचा हात!


कार्ड क्लोनिंग मागे नायझेरियन टोळीचा हात!
SHARES

बोरिवलीत हिरे व्यापाऱ्याला अवैध विक्रीच्या नावाखाली चक्क दोन पोलिसांनीच लुबाडलं होतं. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी त्या दोघा पोलिसांना निलंबित करत त्यांना अटक केली होती. मात्र या गुन्ह्यातीस मुख्य सूत्रधार मनीष मनसुखलाल शाह (27) हा त्या दिवसापासून फरार झाला होता. दरम्यान मनीष ऑनलाईन फसवणुकीसाठी मुंबईत आल्याचं कळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

बोरिवलीत कुटुंबियांसोबत राहणाऱ्या तक्रारदाराचे त्याच परिसरात ज्वेलर्सचं दुकान आहे. तक्रारदार ज्वेलरीसाठी लागणाऱ्या दागिन्यांची खरेदी राज मेहता या मध्यस्थी व्यक्तीच्या मदतीने करायचे. दरम्यान जुलै 2017 मध्ये तक्रारदाराने गुजरातहून राज मेहताच्या मध्यस्थीनं 24 लाख हिऱ्यांची ऑर्डर दिली होती. त्यानुसार राज गुजरातच्या व्यापाऱ्याला घेऊन तक्रारदाराच्या दुकानात आला होता. त्यावेळी दुकानात आधीपासूनच प्रणय शहा आणि सुजाता गौरकर हे दागिने खरेदीच्या नावाखाली उपस्थित होते. गुजरातचा व्यापारी आणि तक्रारदारांसोबत राज मेहता हे हिऱ्याचा व्यवहार करण्यासाठी आले होते.

व्यवहार सुरू असतानाच अचानक दोन पोलिस चंद्रकांत धावरे, संतोष गवस हे त्या ठिकाणी आले. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं हिऱ्याचा व्यवहार होत असल्याचं सांगत दोघांनी राज मेहता, तक्रारदार आणि गुजरातच्या व्यापाऱ्याला ताब्यात घेत हिरेही जप्त केले.


हिरे व्यापाऱ्याची फसवणूक

हिरे खोटे आहेत की खरे याची पडताळणी करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटला जावं लागेल असं सांगत पोलिसांनी गाडी त्या ठिकाणी जाण्यास वळवली. मात्र रस्त्यातच पोलिसांनी त्या तिघांना उतरवलं. पोलिसांच्या या वागण्यावर तक्रारदाराला संशय आल्यानं त्याने बोरिवली पोलिसांत धाव घेतली. बोरिवली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्हीत पोलिस मुख्यालयात तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत धावरे, संतोष गवस यांची ओळख पटली.


'त्या' दोघांना अटक

बोरिवली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणामागे हिऱ्यांचा व्यवहार करणाऱ्या राज मेहताचाच हात असल्याचं पुढे आलं. पोलिस मागावर असल्याचं कळाल्यानंतर राजने महाराष्ट्रातून पळ काढला. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. या प्रकरणात पुढे पोलिसांनी दुकानात उपस्थित असलेले प्रणय शहा आणि सुजाता गौरकर यांचाही सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यांना अटक केली.


असा रचला सापळा

मागील अनेक महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. राज गुजरातमध्ये लपला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बोगस आरोपीला उभे करून राजला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांच्या मोहऱ्याने राजला संपर्क करून एका मोठ्या व्यक्तीच्या एटीएम पीन आणि त्याची बँक मला माहीत असल्याचं सांगितलं. त्याच्या नुसत्या पीन नंबरवर पैसे चोरता येऊ शकतात का? असं राजला विचारले असता राजने होकार दिला. 

त्यानंतर राजने पोलिसांच्या म्होरक्याला गुजरातला बोलवलं. मात्र कामाचं निमित्त पुढे करत पोलिसांच्या म्होरक्याने राजलाच सांताक्रूझ येथे भेटण्यासाठी बोलावलं. त्यानुसार दोघांची भेटण्याची वेळ आणि ठिकाण निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी सापळी रचून राजला गुरुवारी सांताक्रूझ येथून अटक केली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा ताबा बोरिवली पोलिसांना दिला आहे.


चौकशीत राज दिली 'ही' माहिती

राजच्या चौकशीत शहरात होणाऱ्या कार्ड क्लोनिंगच्या गुन्ह्यांचे धक्कादायक वास्तव पुढे आलं. शहराबाहेर एक नायझेरियन टोळी मुंबईतल्या सर्व बँकांचा डेटा काही हजारात मिळवून मुंबईकरांना लुटत आहे. या फसवणुकीसाठी या टोळीला फक्त संबधित खातेदाराची बँक, पीन नंबर किंवा कार्डवरील 16 डिजिट नंबरच आवश्यक आहे. या गोष्टी मिळाल्यास हे नायझेरियन काही क्षणात नागरिकांच्या खात्यातून त्यांच्याजवळल सॉफ्टवेअरच्या मदतीने खातेदाराच्या खात्यातून लाखो रुपये लुटतात. या सॉफ्टवेअरची माहिती ते कुणाला सांगत नाहीत. एका फसवणुकीत माहिती देणाऱ्यास चोरीतले 20 टक्के मिळत असल्याची माहिती राजने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिस आता या नायझेरियन टोळीचा माग काढत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा