Advertisement

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांकडून २८ लाखाचा दंड वसूल, नवी मुंबई पालिकेची कारवाई

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, हे नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये तितकीशी गंभीरता दिसून येत नाही. अनेक नागरीक नियम मोडत असल्याचं दिसून आलं आहे.

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांकडून २८ लाखाचा दंड वसूल, नवी मुंबई पालिकेची कारवाई
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, हे नियम पाळण्याबाबत  नागरिकांमध्ये तितकीशी गंभीरता दिसून येत नाही. अनेक नागरीक नियम मोडत असल्याचं दिसून आलं आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा नागरिकांवर आता नवी मुंबई महानगरपालिकेने बडगा उगारला आहे. नियम मोडणाऱ्यांकडून महापालिकेने २८ लाख १६ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे. 

मास्क न घालणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानांमध्ये जास्त ग्राहकांना प्रवेश देत गर्दी करणे आदी कारणांमुळे पालिकेने दंड आकारला आहे.  सार्वजनिक  ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून एक हजार, मास्क न लावणाऱ्या व्यक्तीकडून ५०० रुपये सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या व्यक्तीकडून २००, तर व्यापारी, दुकानदार यांच्याकडून दोन हजार रुपये  दंड म्हणून महापालिकेकडून आकारले जात आहेत. 

गेल्या काही दिवसांत नवी मुंबईत रोज ३५० ते ४०० कोरोना रुग्ण आढळत आहे. पालिका प्रशासनाकडून आखून दिलेले नियम पाळून बाहेर पडा अशी वारंवार सुचना देऊनही काही नागरिक याकडे कानाडोळा करीत आहेत. कोरोनाचे नियम तोडणाऱ्या लोकांमुळेच संसर्ग पसरण्यास हातभार लागत असल्याने अशा बेफिकिर नागरिकांवर कायद्याने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले होते. यानंतर राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये कोरोनाचे नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दंडवसुली

 थुंकणे –    २६ हजार,

 मास्क न लावणे – ११ लाख ११ हजार ८००

 सुरक्षित अंतर न पाळणे   १ लाख ५६ हजार १००

 सुरक्षित अंतर न पाळणारे व्यापारी/ दुकानदार – १५ लाख २२ हजार ८००

 एकूण दंड वसुली -  २८ लाख १६ हजार ७०० रुपयेहेही वाचा -

कोरोनाने १० दिवसांत 'इतक्या' ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

जम्बो कोरोना केंद्रांत 'या' मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर देणार सेवासंबंधित विषय