Advertisement

एक रुग्ण आढळला तरी इमारतीतील सर्व रहिवाशांची होणार कोरोना चाचणी

तिसरी लाट रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं (NMC) एक अऩोखी कल्पना राबवली आहे.

एक रुग्ण आढळला तरी इमारतीतील सर्व रहिवाशांची होणार कोरोना चाचणी
SHARES

तिसरी लाट रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं (NMC) एक अऩोखी कल्पना राबवली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार तर मिळणार आहेतच. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचा फैलाव रोखायला त्यामुळे मदत होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेनं या योजनेसाठी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. एखाद्या गृहनिर्माण संस्थेतील एका रुग्णाला जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्या इमारतीतील सर्व रहिवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.

टार्गेटेड लिस्टवर नवी मुंबई महापालिकेनं भर दिला असल्यामुळे कोरोना रुग्ण एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता टाळता येणं शक्य होत आहे. नवी मुंबईतील नागरिकांचाही याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शहराला तिसऱ्या लाटेच्या संकटापासून वाचवता येईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

या मोहिमेचा परिणाम म्हणजे नवी मुंबई शहरातील सरासरी रुग्णसंख्या ही ६० वर आली आहे. गेल्या १५ दिवसांत नवी मुंबईत कोरोनाच्या १ लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंतचा हा एक नवा विक्रम मानला जात आहे.

एखाद्या इमारतीत एक रुग्ण जरी सापडला तरी त्या इमारतीतील सर्वांची टेस्ट करण्यात येते. यामुळे टेस्टची संख्या वाढत असली, तरी त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य होत आहे.

साधारणतः एखाद्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली तरी त्याची लक्षणं जाणवायला काही दिवस जातात. या काळात रुग्ण घराबाहेर फिरत असतो आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना कोरोना विषाणूची लागण होत असते.

नवी मुंबई महापालिकेच्या या धोरणामुळे मात्र लक्षणे दिसायच्या आतच टेस्ट केली जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना लक्षणं नसतानाही ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसतं. त्याचप्रमाणे ज्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळतो, त्या इमारतीतील सर्व रहिवासी सतर्क होतात आणि इतरांशी संपर्क टाळतात.



हेही वाचा

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा गौरव

कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या ३९० नागरिकांचंही लसीकरण होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा