Advertisement

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा गौरव

महानगरपालिका आयुक्तांनी हा पुरस्कार आणि गौरव हा खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा असल्याचं नमूद केलं.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा गौरव
SHARES

‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्कारानं महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा ‘स्पीक इंडिया’ या प्रथितयश संस्थेद्वारे विशेष गौरव करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी कोरोना या साथ रोगाच्या काळात मुंबईकरांची सेवा केली आणि करत आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी हा पुरस्कार आणि गौरव हा खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा असल्याचं नमूद केलं.

भारतातील प्रशासकीय सेवेत वर्षभरात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ‘स्पीक इंडिया’ या संस्थेद्वारे दरवर्षी गौरवलं जाते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील १० अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.

या अंतर्गत ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्कारानं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांचा गौरव करण्यात आला आहे.

यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये विविध क्षेत्रातील ७ मान्यवरांचा समावेश होता. या निवड समितीनं महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.हेही वाचा

पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी होणार, वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर तलाव भरले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा