म्हाडाची लाॅटरी श्रीमंतांसाठीच? यंदा अत्यल्प गटाची घरेच नाहीत

  Bandra west
  म्हाडाची लाॅटरी श्रीमंतांसाठीच? यंदा अत्यल्प गटाची घरेच नाहीत
  मुंबई  -  

  म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांचा यंदा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. कारण यंदाच्या म्हाडाच्या लाॅटरीत अत्यल्प गटासाठी घरेच नसल्याची धक्कादायक माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे.

  अल्प गटातील 322, मध्यम गटातील 226 आणि उच्च गटातील 168 अशा एकूण 716 घरांचा यंदाच्या लाॅटरीत समावेश करण्यात आला आहे. तर अत्यल्प अर्थात दुर्बल घटकांसाठी एकही घर यंदाच्या लाॅटरीत नाही.


  उद्देशाला हरताळ

  अत्यल्प गटाला लाॅटरीच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणे म्हाडाचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याने म्हाडाने ऐनवेळी जागे होत अत्यल्प गटातील घरांचा शोध सुरू केला.

  त्यानुसार, शहरात ठिकठिकाणी विखुरलेली, जुनी 68 घरे मुंबई मंडळाने शोधून काढल्याची माहिती मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लॉटरीतील घरांचा आकडा 784 वर जाऊ शकतो.


  अशी शोधलीत घरे...

  या 68 घरांपैकी फारक कमी घरे अत्यल्प गटातील आहेत. जर ही घरे लॉटरीत आली तर त्यातील किमान 4 ते 5 टक्केच घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची लाॅटरी दुर्बल-अत्यल्प गटासाठी नव्हे, तर श्रीमंतांसाठीच की काय? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. यातून म्हाडा आपल्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत असल्याची चर्चा म्हाडात रंगली आहे.


  चिंता वाढलीय

  गरीब, अत्यल्प गटाला परवडणारी घरे उपलब्ध करुन देणे याच उद्देशाने म्हाडाची स्थापना झाली आहे. आतापर्यंतच्या लाॅटरीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने अत्यल्प आणि अल्प गटातील नागरीकांच्या घराचे स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षात म्हाडाकडे घरेच उपलब्ध नसल्याने मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

  महत्त्वाचे म्हणजे अत्यल्प गटातीत घरांसाठीच सर्वाधिक मागणी असते. या गटासाठी लाखोंनी अर्ज म्हाडाकडे येतात. अशावेळी यंदांच्या लॉटरीत केवळ 30-40 घरेच या गटासाठी उपलब्ध झाल्यास म्हाडाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागेल.


  यंदाच्या लाॅटरीत अत्यल्प गटासाठी घरे नाहीत असे नाही. विखुरलेली घरे आम्ही शोधून काढली असून त्या माध्यमातून या गटालाही लाॅटरीत समाविष्ट करुन घेण्याचा प्रयत्न आहे. या घरांच्या किमती कमीत कमी कशा राहतील, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
  - सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा


  महाग घरे

  म्हाडाची घरे वर्षानुवर्षे महाग होत असल्याने म्हाडाची लाॅटरी गरीब-दुर्बलांसाठी राहिलेलीच नाही. यंदा तर उच्च गटातील पवई तुंगा येथील घरे 1 कोटी 61 लाखांची असणार आहेत. तर इतर सर्वच गटातील घरे महाग असल्याची चर्चा म्हाडात आहे.


  लाॅटरीसाठी उत्पन्न गट असा

  अत्यल्प गट- (ईडब्ल्यूएस) -25,000 रु. पर्यंत
  अल्प गट- (एलआयजी) -25,001 ते 50,000 पर्यंत
  मध्यम गट- (एमआयजी) -50,001 ते 75,000 पर्यंत
  उच्च गट- (एचआयजी) -75,001 पेक्षा जास्त


  'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागलेली यंदाच्या लाॅटरीतीतील घरांची यादी अशी -
  (ही यादी प्राथमिक असून यात घरांची वाढ होण्याची शक्यता आहे)


  ठिकाण
   उत्पन्न गट
   घरांची संख्या
  सायन, प्रतिक्षानगर, टप्पा-4
  अल्प गट
  28
  कन्नमवारनगर, विक्रोळी
  मध्यम गट
  140
  तुंगा, पवई
  एचआयजी-2  उच्च गट
  84
  तुंगा, पवई
  एचआयजी-2  उच्च गट
  84
  न्यू सिद्धार्थ नगर,गोरेगाव (प)
  अल्प गट
  84
  गेस्ट हाऊस प्लाॅट, उन्नत नगर, गोरेगाव (प)
  अल्प गट
  80
  प्लाॅट नं. 3, सेक्टर 8, चारकोप, कांदिवली (प)
  अल्प गट
  130
  प्लाॅट नं. 3, सेक्टर 8, चारकोप कांदिवली (प)
  मध्यम गट
  86

  एकूण
  716


  तर, लॉटरीत समावेश

  • या यादीनुसार अत्यल्प गटासाठी एकही घर नसल्याचे स्पष्ट 
  • जुन्या 68 घरांच्या समावेशाची शक्यता 
  • घरे 784 वर जाण्याची शक्यता 
  • 68 पैकी काही घरे अत्यल्प गटासाठी    हे देखील वाचा -  

  म्हाडाच्या 'परवडणाऱ्या' घराची किंमत 1 कोटी 61 लाख!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.