Advertisement

बेस्टच्या 'त्या' वसाहतीत कोरोना नाही

या कर्मचाऱ्याच्या घरातील सर्वच्या सर्व चारही सदस्यांची करोना तपासणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.

बेस्टच्या 'त्या' वसाहतीत कोरोना नाही
SHARES

बेस्टच्या परळ येथील कामगार वसाहतीमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी ही इमारतही सील करण्यात आली होती. या इमारतीतील बेस्ट कामगाराचा जावई, माहेरी आलेली मुलगी आणि नातीस करोनाची लागण झाल्यानं महापालिकेने संपूर्ण इमारत सील केली होती. परंतु, या कर्मचाऱ्याच्या घरातील सर्वच्या सर्व चारही सदस्यांची करोना तपासणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या वसाहतीमधील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

परळमधील बेस्ट कामगारांच्या वसाहतीतील ही इमारत सोमवारी सील करण्यात आली. त्यावेळी महापालिकेनं तातडीनं या कामगाराच्या घरातील इतर सदस्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. त्यात संबंधित कामगाराची आई, पत्नी, मुलगा यांचा समावेश होता. या तपासणीचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. या चौघांनाही करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तूर्तास तरी परिसरातील ताण कमी झाला आहे.

अत्यावश्यक सेवेत सहभागी असलेल्या बेस्ट कामगारांना संसर्गाची भीती वाटत आहेत. योग्य सुविधांचा अभाव असूनही सेवा बजाविणाऱ्या कामगारांमध्ये त्याचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात स्तरावर होईल, अशी कामगारांमध्ये चर्चा असते. त्यातच परळमधील कामगाराच्या जावयास झालेली करोनाची लागण चिंतेचा भाग ठरली. 

या कामगाराची माहेरी आलेली विवाहित मुलगी आणि नातीस करोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यात आणखी भर पडली. मात्र, वैद्यकीय तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या इमारतीसह संपूर्ण वसाहतीत समाधानाचे वातावरण आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा