अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष

 Sewri
अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष
अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष
अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष
See all

शिवडी (पू.) - दिवस-रात्र ऑइलचे कंटेनर अवैधरित्या  उभे केलं जात असल्यानं बीपीटी मेसलरोड या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांचे हाल झाले आहेत. बीपीटी मेसल रोड हा अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. शिवडी पूर्व भागात मोठ्या प्रमाणात ऑइल कंपन्या असल्यानं इथं ऑइल कंटेनरच्या वाहनांची ये-जा असते. परंतू सध्या या मार्गावर पार्किंग झोन व्यतिरिक्त अनधिकृतपणे ऑइल कंटेनर वाहनं रस्त्यावर उभी केली जात असल्यानं पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र अनधिकृत वाहन पार्किंगकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं दिवसेंदिवस या मार्गावर ऑइल कंटेनर वाढत आहेत. यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. असं प्रवासी रफिक पटेल यांनी सांगितलं.

याबाबत वडाळा वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय सावंत यांना विचारले असता हिपोक्रेन उपलब्ध नसल्यानं एवढ्या मोठ्या गाड्या उचलणं शक्य होत नाही. मात्र या ऑइल कंटेनरवर व्हील क्लँबलॉकच्या सहाय्यानं कारवाई करण्यात येईल. तसंच विभागात अनधिकृतरित्या कुठे वाहने उभी राहतात या जागेची पाहणी देखील करण्यात येईल असं सावंत यांनी सांगितलं.

Loading Comments