Advertisement

मेट्रो 6 मुळे होणार नाही पवई तलावाचे सुशोभिकरण

पवई तलावाच्या जवळून मेट्रो ६ जाणार असल्यामुळे याठिकाणी सध्या कोणतेही काम करू नये, अशा मेट्रोकडून सूचना.

मेट्रो 6 मुळे होणार नाही पवई तलावाचे सुशोभिकरण
SHARES

पवई तलावाच्या सुशोभिकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले असून या कामालाच आता मेट्रो रेल्वेने ब्रेक लावला आहे. पवई तलावाच्या जवळून मेट्रो ६ जाणार असल्यामुळे याठिकाणी सध्या कोणतेही काम करू नये, अशा सूचना मेट्रोकडून आल्यामुळे तूर्तास पवई तलाव परिसराचा प्रवेश मार्ग आणि प्रोमेडचा परिसर सुशोभित न करता उर्वरीत काम केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.


पवई तलावाचे सुशोभिकरण आणि पवई तलावात झिरपणारे सांडपाणी आदींचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. यासाठी नेमलेल्या सल्लागाराच्या अहवालानुसार पुढील कामे हाती घेण्यात येत आहेत. परंतु, पवई तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामात मेट्रोचा अडथळा निर्माण झाला आहे. मेट्रो ६ च्या कामासाठी एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रोने महापालिकेला विनंती करून या ठिकाणचे काम सध्या करू नये, अशा प्रकारची सूचना केली आहे. त्यामुळे पवई लेकफ्रंट अर्थात प्रवेशमार्ग आणि आसपासच्या परिसराचे काम करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


पवई तलावाच्या सुशोभिकरणात तीन भागांमध्ये कामे केली जाणार आहेत. यामध्ये पवई तलावात सांडपाणी सोडणारी मुखे बंद करण्यात येतील. त्यानंतर पाण्याची पातळी वाढवण्यासाठी तसेच पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आदींची कामे केली जाणार असल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.


संगीत कारंजे चार महिन्यांसाठी बंद

पवई तलावातील संगीत कारंजे सध्या सुरू आहेत. मात्र, उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे संगीत कारंजे बंद राहत असल्याची कबुली मुखर्जी यांनी दिली आहे.



हेही वाचा - 

मेट्रो ३ विरोधात आरेत 'चिपको आंदोलन'

कोण वाचवणार पवई तलाव?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा