Advertisement

कोण वाचवणार पवई तलाव?


SHARES

पवई - कचरा, गाळ, बघाल तिथं उकिरडा, अशी अवस्था झालीये मुंबईतल्या सर्वात मोठ्या पवई तलावाची. विस्तीर्ण आणि मनमोहक असा हे तलाव पुरता अस्वच्छ झालाय. याला कारणीभूत आहेत कारखाने. भरीस भर म्हणून हॉटेलमधलं सांडपाणीही यात सोडलं जातंय. महापालिकेनं हे सांडपाणी बंद केल्याचा दावा केला होता. पण सोमवारी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, गटनेता मनोज कोटक आणि स्थायी समिती सदस्य संतोष धुरी यांनी या तलावाची पाहणी केली. त्यातून पालिकेचं पितळ उघडं पडलंय.

काही दिवसांपूर्वी या तलावात हाऊस बोट उलटून अपघात झाला होता. तरीही पालिकेचे डोळे उघडले नाहीत असंच चित्र इथं पाहायला मिळतंय. बुधवारी स्थायी समितीची पालिकेत बैठक आहे. पाहाणी करणारे अध्यक्ष आणि सदस्य या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरणार का, पवई तलाव वाचवण्याचा प्रयत्न करणार का, या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा