बोनससाठी बेस्ट कर्मचारी रस्त्यावर

 Pali Hill
बोनससाठी बेस्ट कर्मचारी रस्त्यावर

मुंबई - दिवाळी बोनसच्या मागणीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. 19 ऑक्टोबरला आझाद मैदानावर बेस्ट कर्मचारी मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली. बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, रयत राज कामगार आदी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. बोनस मिळाला नाही तर महापौर बंगल्यावर मोर्चा नेण्यात येईल अशी माहितीही कर्मचाऱ्यांनी दिलीय.

Loading Comments