Advertisement

मुंबईतील भाजीपाला पुरवठा सुरळीत, ‘या’ भागातून आवक सुरू

कोविडच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याचा मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा खुलासा पणन विभागाने केला आहे.

मुंबईतील भाजीपाला पुरवठा सुरळीत, ‘या’ भागातून आवक सुरू
SHARES

कोविड-१९  (coronavirusच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या १० दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे १२ मे ते २१ मे २०२१ पर्यंत बाजार समित्याचं कामकाज बंद आहे. मात्र याचा मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा खुलासा पणन विभागाने केला आहे.

नाशिक (nashikजिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या १२ मे ते २१ मे २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश १२ मे, २०२१ देण्यात आले आहेत. या आदेशातील परिच्छेद ३ मध्ये त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या हितास्तव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी भाजीपाला पुरवठ्याची व्यवस्था वेगवेगळ्या स्तरावर विकेंद्रीत करुन भाजीपाला व फळे यांचा पुरवठा सुरळीत राहील, अशी व्यवस्था करावी. 

हेही वाचा- मुंबईतील कोरोनाची लाट ओसरतेय

याच आदेशात अंतर-शहर व आंतर-जिल्ह्यात, फळे व भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध लागू नाहीत. भाजीपाला पूर्णत: नियमनमुक्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन आता बाजार समितीच्या यार्डमध्ये आणणं आवश्यक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही.

तसंच नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या १० दिवसांसाठी बंद असल्या तरी त्याचा परिणाम मुंबईतील (mumbai) आवक वर झालेला नाही. मुंबईतील भाजीपाल्याच्या पुरवठ्यात, नाशिक जिल्ह्यातून १५-२० टक्के या प्रमाणात होतो. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या जरी बंद असल्या तरी मुंबईला अहमदनगर, पुणे, सातारा व पालघर या जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरातील भाजीपाल्यावर परिणाम नाही.

यावर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये अन्नधान्यांच्या खरेदी-विक्रीला काही प्रमाणात सूट देण्यात आल्याने लोकांना सहजपणे खरेदी करता येत आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर खाद्य पदार्थांची टंचाई मुंबईकरांना अद्याप तरी मोठ्या प्रमाणात जाणवलेली नाही.

(no effect on vegetable supply in mumbai after vashi APMC market closed due to covid 19)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा