ग्रुप पासिंगची अट नापास

 Kalina
ग्रुप पासिंगची अट नापास

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असलेली ग्रुप पासिंगची अट मुंबई विद्यापीठाने नुकतीच रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांऐवजी केवळ नापास झालेल्या विषयाचीच परीक्षा द्यावी लागणार आहे. या आधी विद्यार्थ्यांना एका पेपरात नापास झाल्यास, संपूर्ण सेट पुन्हा देणे बंधनकारक होते. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी परीक्षा पद्धतीत बदल करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक बोलवली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे जुन्या पद्धतीनेच परीक्षा होत असलेल्या एमए, एमकॉम आणि एमएससी या पारंपारिक अभ्यासक्रमांमध्ये आता चार विषयांपैकी एक विषय राहिला तर केवळ त्याच विषयाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

Loading Comments