Advertisement

Covid-19 In Mumbai: मुंबईत १०० टक्के लाॅकडाऊनची गरज नाही, महापालिका आयुक्तांनी केला खुलासा

मुंबईतील कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर गेला असून रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे.

Covid-19 In Mumbai: मुंबईत १०० टक्के लाॅकडाऊनची गरज नाही, महापालिका आयुक्तांनी केला खुलासा
SHARES

मुंबईतील कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर गेला असून रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा अपेक्षित (no strict lockdown in mumbai due to decreasing covid 19 patients says bmc commissioner iqbal singh chahal) आहे. त्यामुळे मुंबईत १०० टक्के लाॅकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही, असा खुलासा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केला आहे. 

मुंबई शहर देशातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबईप्रमाणे आता मुंबईतही १०० टक्के कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येणार की काय अशी धाकधूक मुंबईकरांना वाटू लागली आहे. त्यावर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना इकबाल सिंग चहल म्हणाले, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून ती पुणे आणि ठाण्यासारखी नाही. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर गेला आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - रुग्णालयातील किती खाटा रिक्त? रोज माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महापालिकेने चेस द व्हायरस या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील रुग्ण शोधण्यासाठी कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं. मुंबईत रोज ४ ते साडेचार हजार होणाऱ्या कोरोना चाचण्या वाढवून आम्ही रविवारी ६८०० चाचण्या केल्या.

सरासरी ४ हजार चाचण्यांमध्ये १३०० ते १४०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायचे. तर ६८०० चाचण्यांमध्ये केवळ १२४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही केवळ २०० रुग्ण हे रुग्णालयात दाखल करण्याच्या अवस्थेतील असल्याची माहिती इकबाल सिंग चहल यांनी दिली.  

कोरोना चाचण्या वाढवताना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील खाटाही वाढवल्या. अतिदक्षता विभागातील खाटा, संस्थात्मक विलगीकरण व्यवस्थेचाही विस्तार केला. सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण खाटांपैकी ७००० खाटा रिकाम्या आहेत. तर अतिदक्षता विभागातील २५० खाटा रिकाम्या असल्याचंही इकबाल सिंग यांनी सांगितलं.  

संबंधित विषय
Advertisement