Advertisement

पावसाळ्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी नाही - यूपीएस मदान


पावसाळ्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी नाही - यूपीएस मदान
SHARES

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-7 च्या कामामुळे पावसाळ्यात वाहतूककोंडी होणार नाही, तसेच कुठेही पाणी साचणार नाही, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यूपीएस मदान यांनी केला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मदान यांनी बुधवारी माहीम काॅजवे ते दहिसर या 25 किमीच्या परिसराची पाहणी केली आहे. तर मेट्रो-7 च्या कामाचीही पाहणी केली, यावेळी मदान यांनी हा दावा केला आहे.

मेट्रो-7 चे काम जोरात सुरू असून पश्चिम द्रूतगती मार्गावर हे काम करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करत मदान यांनी पावसाळ्यापूर्वी पायलिंग, पाईल्स कॅप्स, पियरची कामे पूर्ण करा, असे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. तर पाणी साचू नये यासाठी पश्चिम द्रूतगती मार्गावरील दोन्ही बाजूच्या नाल्यांची सफाई करण्यात आली असून रस्त्याच्या कोटींगचे कामही बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आहे.

त्यामुळे पावसाळ्यात वाहतूककोंडी होणार नाही आणि पाणीही साचणार नाही, असे मदान यांनी स्पष्ट केले आहे. तर 1 जूनपासून 'एमएमआरडीए'त 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून या कक्षाकडे नागरिकांना पावसाळ्यातील तक्रारी नोंदवता येणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा