Advertisement

मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद, ‘हे’ आहे त्यामागील कारण

मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद, ‘हे’ आहे त्यामागील कारण
Representative image
SHARES

मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर शुक्रवारी १० सप्टेंबरला कोविड लसीकरण बंद राहणार आहे. दरम्यान, महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शनिवारी (११ सप्टेंबर) लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू राहणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीनं पुढील नियोजन करून प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. त्या कारणास्तव शुक्रवारचे लसीकरण बंद असेल.

येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करणं आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही करण्यात येत आहे.

यास्तव, उद्या (१० सप्टेंबर) कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक १०, ११, १४, १६ आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे.

संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक १०, ११, १४, १६ आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून लसीचे १ लाख ४० हजार डोस दिले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती.



हेही वाचा

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल; १ कोटी ७९ लाख नागरीकांचा दुसरा डोस पूर्ण

कोरोनाची तिसरी लाट आधीच आली, किशोरी पेडणेकर यांची माहिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा