Advertisement

गुड न्यूज! मुंबईतील सात धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा

सध्या तरी पाणीकपात करण्यात आली नाही.

गुड न्यूज! मुंबईतील सात धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा
SHARES

ऑगस्टमध्ये विश्रांती घेणाऱ्या पावसाने ७ सप्टेंबरपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात जोरदार बरसात सुरू केली आहे. त्यामुळे तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत प्रत्येकी १७५ ते २०० मिमी इतका पाऊस पडला. परिणामी मुंबईतील सात धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा आहे.

सध्या सात तलावांत एकूण १३ लाख ९२ हजार ३९३ दशलक्ष लिटर (९६.२० टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ३६१ दिवस म्हणजे २४ मे २०२४ पर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईला पावसाळा संपल्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पुढील वर्षभरासाठी सात तलावांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. तरच वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करणे शक्य होते. साठा कमी असल्यास किमान १० टक्के ते १५ टक्के इतकी पाणीकपात करावी लागते.

सध्या सात तलावांतील पाणीसाठा मे २०२४पर्यंत पुरेसा इतका आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळले आहे. अद्याप सप्टेंबरमधील तीन आठवडे शिल्लक आहेत. या कालावधीत आणखी चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित भातसा, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा हे तीन तलावसुद्धा भरून वाहू लागतील. यापूर्वी जुलैमध्ये तानसा, मोडक सागर, तुळशी आणि विहार हे चार तलाव भरून वाहू लागले होते.



हेही वाचा

मुंबई : गणेश चतुर्थीच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : बीएमसी शाळांमध्ये नाईट क्लासेसना सुरुवात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा