Advertisement

लक्ष द्या! ठाण्यातल्या 'या' भागात शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

कोपरीमध्ये गुरुवारी (आज)पाणी नाही

लक्ष द्या! ठाण्यातल्या 'या' भागात शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद
SHARES

STEM प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्ती तसेच साकेत पुलावरील ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शुक्रवार, 26 मे सकाळी 9.00 ते शनिवार, 27 मे सकाळी 9.00 या कालावधीत २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. 

या कालावधीत एसटीईएम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

तसेच ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करून साकेत पुलावरील व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहे. या कामांसाठी हा 24 तास शटडाऊन घेण्यात येणार आहे.

या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, रितू पार्क, जेल परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रूपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

26 मे सकाळी 9:00 ते 27 मे सकाळी 9:00 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

कोपरीमध्ये गुरुवारी पाणी नाही

ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील धोबीघाट पाणलोटातील 500 मिमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकासकामांवर बाधित असल्याने स्थलांतराचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरुवार, 25 मे ते शुक्रवार 26 मे सकाळी 9.00 वाजेपर्यंत कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभाचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे.

या काळात नागरिकांनी पाण्याची योग्य साठवणूक करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा