Advertisement

कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरात पाणीकपात

एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे.

कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरात पाणीकपात
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबई (mumbai) शहरात आणि आसपासच्या भागात पाणीकपात होताना दिसून येत आहे. 5 ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व, दादर येथे तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच नवी मुंबईतही (navi mumbai) 4 फेब्रुवारीला 10 तासांसाठी पाणी पुरवठा (water supply) स्थगित करण्यात आला होता. अपुरा पाणीसाठा, पाईपलाईनची देखभाल या कारणास्तव इतर अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे आता ठाणे महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) हद्दीत येणाऱ्या काही भागात पाणीकपात (water cut) होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कटई नाका (katai naka) ते मुकुंद पर्यंतच्या बारवी ग्रॅव्हिटी पाईपलाईनवर तातडीचे देखभालीचे काम करण्यात येणार आहे.

यामुळे, ठाणे (thane) महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या कळवा (kalwa), मुंब्रा (mumbra) आणि दिवा (Diva) भागातील पाणीपुरवठा गुरुवार 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही तासांसाठी कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा करण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेने (टीएमसी) रहिवाशांना या काळात पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा आणि ते काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

बीडीडी चाळीतील रहिवाशांना 'या' महिन्यात मिळणार घरं

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा