Advertisement

ठाणेकरांनो लक्ष द्या! बुधवार-गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद

त्यामुळे बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणेकरांनो लक्ष द्या! बुधवार-गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) स्वतःच्या योजनेंतर्गत 2000 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम बुधवार 15 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग N-H3 च्या बाजूला असलेल्या लोढा धाम येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील माजिवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी इ. तसेच कळवा आणि मुंब्य्रातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



हेही वाचा

१ एप्रिलपासून टोल वाढण्याची शक्यता

मुंबईत भाड्याने राहणाऱ्यांसाठी पोलिसांचा नवा आदेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा