Advertisement

१ एप्रिलपासून टोल वाढण्याची शक्यता

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जावेत.

१ एप्रिलपासून टोल वाढण्याची शक्यता
SHARES

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) १ एप्रिलपासून टोलचे दर वाढवण्याचा विचार करत आहे. एनएचएआयच्या या निर्णयानंतर वाहनधारकांवर टोलचा अतिरिक्त बोजा आणखी वाढू शकतो.  ( NHAI Planning to increase toll rates from April 1)

याआधी, केंद्र सरकार टोल प्लाझाच्या जागी नंबर प्लेट रिडिंग कॅमेरे लावण्याचा विचार करत असल्याचे वृत्त  होते. एका मुलाखतीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा केला की केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझा काढून टाकण्याची आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) कॅमेऱ्यांवर अवलंबून राहण्याची योजना आखत आहे. (Mumbai toll news)

राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय या महिन्याच्या अखेरीस प्रस्तावांची तपासणी करणार आहे आणि योग्य विचार केल्यानंतर दर मंजूर केले जाऊ शकतात.

कार आणि हलक्या वाहनांसाठी टोल दर 5% वाढण्याची अपेक्षा आहे आणि इतर अवजड वाहनांसाठी 10% पर्यंत वाढू शकते. अलीकडेच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी टोलचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या नव्याने उघडलेल्या विभागावरील टोल 2.19 रुपये प्रति किलोमीटर आहे आणि त्यात सुमारे 10% वाढ होईल.



हेही वाचा

आता CSMT वरून उल्हासनगरपर्यंत करा मट्रो प्रवास

मुंबईत भाड्याने राहणाऱ्यांसाठी पोलिसांचा नवा आदेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा