Advertisement

लक्ष द्या! ठाण्यात 22-23 फेब्रुवारीला पाणीपुरवठा होणार नाही

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

लक्ष द्या! ठाण्यात 22-23 फेब्रुवारीला पाणीपुरवठा होणार नाही
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.00 वाजेपासून ते शुक्रवार 23 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा होणार नाही.

मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे (काही भाग) प्रभाग समित्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत गुरुवारी काटई नाका ते बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीच्या शाली टाकीपर्यंत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. 

सदर बंद कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती आणि रुपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक 2 वागळे प्रभाग समिती, नेहरूनगर तसेच कोलशेत खालचा गाव अंतर्गत मानपाडा प्रभाग समिती २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

तसेच, पाणी टंचाईच्या काळात पाणी काटकसरीने वापरावे आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.



हेही वाचा

मुंबईकरांना पुन्हा गुलाबी थंडी जाणवणार

सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा