Advertisement

महापालिका अभियंत्यांचे अाता 'नो एक्स्ट्रा टाइम वर्क'


महापालिका अभियंत्यांचे अाता 'नो एक्स्ट्रा टाइम वर्क'
SHARES

मुंबई महापालिकेचे अभियंते दररोज किमान १२ ते १४ तास काम करत अाहेत. त्यांच्या कार्यालयीन वेळा निश्चित करण्यात टाळाटाळ होत असतानाच अाता बायोमॅट्रिक हजेरीमुळे त्यांच्या पगारातही कपात करण्यात अाली अाहे. याचा निषेध म्हणून महापालिकेचे सर्व अभियंते येत्या सोमवारपासून कार्यालयीन वेळेतच काम करणार आहेत. 'एक्स्ट्रा टाइम' भरूनही जर महापालिका प्रशासनाला अास्था नसल्यामुळे या अभियंत्यांनी अाता 'नो एक्स्ट्रा टाइम'ची भूमिका घेतली अाहे. 



अभियंते नोंदवणार निषेध

प्रशासनाकडून अभियंत्यांच्या कार्यालयीन वेळा निश्चित करण्याबाबत होणाऱ्या अक्षम्य दिरंगाईमुळे  अभियंत्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच बायोमॅट्रिक प्रणालीनुसार वेतन कपातीची भर पडली आहे. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून महापालिकेचे अभियंते सोमवार १२ मार्चपासून फक्त कार्यालयीन वेळेतच काम करतील, असे बृहन्मुंबई महापालिका अभियंता कृती समितीचे अध्यक्ष अॅड सुखदेव काशिद आणि सरचिटणीस साईनाथ राजध्यक्ष यांनी सांगितले.


कुटुंबाला देणार अधिक वेळ

मधल्या सुट्टीचे तंतोतंत पालन करून कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर विभाग कार्यालय आणि कामाचे स्थळ सोडून आपापल्या घरी जाऊन कुटुंबाला वेळ द्यावा, असे आवाहन कृती समितीने केले आहे. आतापर्यंत अभियंत्यांनी अधिक वेळ सेवा करूनही त्यांच्यावर कारवाई केली अाहे. नालेसफाईनंतर रस्ते घोटाळ्यात १८० अभियंत्यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळेही अभियंत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयात याचा निषेध म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी खाली उतरून आंदोलन केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा