Advertisement

आता ड्रोनचा वापर होणार व्यवसायिक पद्धतीनं

ड्रोनच्या वापरासंबंधीच्या नवी नियमावलीनुसार ड्रोनची ५ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यातील सर्वात छोट्या 'नॅनो ड्रोन'चं वजन हे २५० ग्रॅम असणार असून सर्वात मोठ्या ड्रोनचं वजन हे १५० किलोपर्यंत ठेवण्यात आलं आहे. त्याशिवाय फक्त दिवसा ४०० फूट उंचीपर्यंत तुम्हाला ड्रोनचा वापर करता येणार आहे.

आता ड्रोनचा वापर होणार व्यवसायिक पद्धतीनं
SHARES

तुम्ही ई-कॉर्मस साईटवर एखाद्या वस्तूची ऑर्डर केली आणि तिची डिलिव्हरी तुम्हाला ड्रोनद्वारे मिळाली तर? विश्वास बसत नाही ना? पण हे खर आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं ड्रोनच्या व्यावसायिक वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला आता कायदेशीररित्या ड्रोन उडवता येणार आहे. केंद्र सरकारनं ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण नुकतंच जाहीर केल असून सध्या ही परवानगी देताना काही ठराविक सेवांपूरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे.


'अशी' आहे नवी नियमावली

ड्रोनच्या वापरासंबंधीच्या नवी नियमावलीनुसार ड्रोनची ५ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यातील सर्वात छोट्या 'नॅनो ड्रोन'चं वजन हे २५० ग्रॅम असणार असून सर्वात मोठ्या ड्रोनचं वजन हे १५० किलोपर्यंत ठेवण्यात आलं आहे. त्याशिवाय फक्त दिवसा ४०० फूट उंचीपर्यंत तुम्हाला ड्रोनचा वापर करता येणार आहे.


'अशी' घेता येईल परवानगी

'नॅनो ड्रोन'च्या वापरासाठी कुठल्याही प्रकारची परवानगीची आवश्यकता नसली, तरी त्याचा वापर करण्याआधी पोलिस प्रशासनाला त्याची कल्पना द्यावी लागेल. मात्र मोठ्या ड्रोनसाठी परवाना असणं बंधनकारक असणार आहे. या परवान्यासाठी 'डिजिटल स्काय पोर्टल'वर नोंदणी करावी लागणार असून त्याचा वापर करणाऱ्यांना एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येणार आहे.


'या' गोष्टी असणार आवश्यक

तसंच ज्याला ड्रोनचे परवाने हवे असतील त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणं बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय त्याला दहावीपर्यंतच्या शिक्षणाबरोबरच इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं ही आवश्यक असणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे या संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन मोबाईल अॅपद्वारे होणार आहे. तसचं तुमच्या ड्रोनसाठी परवानगी मिळाली की नाही याबाबतची सविस्तर माहिती यूजर्सला तात्काळ मिळणार आहे.


कशासाठी वापर?

शेती, आरोग्य, आपत्ती निवारण या क्षेत्रामध्ये ‘ड्रोन’चा व्यावसायिक पद्धतीनं वापर करण्यास सरकार परवानगी दिली असून कोणत्याही खाद्यपदार्थांची सेवा देण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे. तसंच विमानतळ, देशाची सीमा, सागरी हद्द, सचिवालये, लष्कराशी संबंधित इमारती आणि क्षेत्र, व इतर संवेदनशील ठिकाणी ‘ड्रोन’चा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.



हेही वाचा-

रेल्वे रुळांवर ठेवली जाणार 'ड्रोन'ने गस्त

ड्रोन टिपणार मुंबईकरांच्या हालचाली



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा