मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पदार्थांवर जीएसटी नाही


SHARE

विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळावरील पदार्थांवर जीएसटी भरावा लागणार नाही. कारण मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करमुक्त दुकानांतील (ड्युटीफ्री शॉप्स) पदार्थ व वस्तूंवर जीएसटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहेराज्याच्या विक्रीकर विभागानं विक्रीवर आकारलेल्या जीएसटीचा परतावा मिळावा 'इनपूट टॅक्स क्रेडिट'ची मागणी विक्रीकर उपायुक्तांनी १० जानेवारी २०१९ रोजी फेटाळून लावली होतीत्याला फ्लेमिंगो ट्रॅव्हल रिटेल लिमिटेड व अन्य काहींनी रिट याचिकांद्वारे आव्हान दिलं होतंयासंदर्भातल्या विषयीच्या सुनावणीअंती न्यारणजित मोरे व न्याभारती डांगरे यांच्या खंडपीठानं नुकताच हा निर्णय दिला. 


ड्युटीफ्री शॉप्स

'सीमाशुल्क किंवा जीएसटी हे सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारीतील गोदामांतील वस्तू बाहेर पडल्यानंतरच आकारता येतेम्हणजेच विमान प्रवासानं आलेला प्रवासी सीमाशुल्क विभागाच्या हद्दीतून बाहेर पडल्यानंतरच ही आकारणी लागू होतेड्युटीफ्री शॉप्स हे सीमाशुल्क विभागाचा प्रदेश सोडत नाहीतत्यामुळे त्यांना सीमाशुल्क किंवा जीएसटीही लागू होत नाही', असं खंडपीठानं निर्णयात म्हटलं आहे.


विमान प्रवास

'आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान प्रवासानं जाणाऱ्या व आलेल्या प्रवाशांसाठी ही दुकानं आहेतत्यांच्यावर स्थानिक कराचा भार टाकला तर किंमती आणखी वाढतील आणि जगभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्युटीफ्री शॉप्ससोबत स्पर्धा करण्यात भारतातील अशा ड्युटीफ्री शॉप्सना अडथळे निर्माण होतीलअसं खंडपीठानं निर्णयात स्पष्ट केलं आहे.हेही वाचा -

भिवंडीमध्ये खड्डा चुकवताना डॉक्टर तरुणीचा मृत्यू

राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला मुंबईत सभासंबंधित विषय
ताज्या बातम्या