Advertisement

भिवंडीमध्ये खड्डा चुकवताना डॉक्टर तरुणीचा मृत्यू

भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डा चुकवताना काढताना एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

भिवंडीमध्ये खड्डा चुकवताना डॉक्टर तरुणीचा मृत्यू
SHARES

भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डा चुकवताना काढताना एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. डॉ. नेहा आलमगीर शेख (२३) असं या तरुणीचं नाव असून बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. नेहा ही खड्डा चुकवताना दुचाकीवरून पडली. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून तिचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी कुडूस नाका इथं काही तास रास्ता रोको आंदोलन केलं.

खड्डा चुकवताना मृत्यू

डॉनेहा शेख हीच ९ नोव्हेंबर रोजी लग्न ठरलं होतं. नेही ही वाडा तालुक्यातील कुडूस इथं राहणारी असून लग्नाच्या तयारीसाठी ती नातेवाईकांसह बुधवारी ठाणे इथं गेली होती. लग्नाची खरेदी झाल्यानंतर नेहा भावासोबत अॅक्टिव्हावरून कुडूस इथं परतत होती. मात्र, भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा इथं खड्डा चुकवताना ती गाडीवरून पडली आणि समोरून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला.

टोलनाक्यावर धडक

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अनगाव येथील टोलनाक्यावर धडक देऊन रस्ता सुस्थितीत होईपर्यंत टोल बंद करण्याची मागणी करत टोलनाका बंद पाडला. गुरुवारी सकाळी नेहावर अंतिम संस्कार झाल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको करीत रस्ते कंत्राटदार सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा निषेध नोंदवून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळं आता या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला मुंबईत सभा

भारीच! SMS ने बदलता येणार टीव्ही चॅनेल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा