दिव्यांगांच्या सोयीसाठी मंत्रालयात व्हिलचेअरसह मदतनीस

  Mantralaya
  दिव्यांगांच्या सोयीसाठी मंत्रालयात व्हिलचेअरसह मदतनीस
  मुंबई  -  

  दिव्यांग व्यक्तींना मंत्रालयतल्या कामकाजासाठी वेगवेगळ्या विभागात जावे लागते. मात्र त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयचे आदेश असतानाही मंत्रालयात दिव्यांगांसाठी केलेल्या दिव्यांगस्नेही उपाययोजना बंद करण्यात आल्या होत्या. त्या सुविधा गुरुवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. दिव्यांगाना मंत्रालयाच्या ज्या विभागात जायचे असल्यास त्यांना तिथे पोहचवून पुन्हा मुख्य गेटवर सोडणे, अशा स्वरुपाचा उपक्रम गुरुवारपासून सुरू करण्यात येत असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी मंत्रालयात केली.

  1995 साली दिव्यांग व्यक्तींच्याबाबतीत कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भातील एका याचिकेवर कोणत्या राज्याने कोणत्या दिव्यांगस्नेही उपाययोजना केल्या आहेत याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागितली होती. त्यावेळी मंत्रालयात काही काळासाठी अशा प्रकारच्या सुविधा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने या सुविधा बंद करण्यात आल्या.

  मंत्रालयाच्या मुख्य दोन प्रवेशद्वारांवर प्रत्येकी एक व्हिलचेअर आणि ती चालवत नेऊन दिव्यांगाना अपेक्षित विभागात पोहचवून पुन्हा त्यांना मुख्य द्वारापर्यंत आणणारा प्रत्येकी एक मदतनीस देण्यात आला आहे. सर्व विभागांसाठी दिव्यांगाची निवेदनं तळमजल्यावर एकाच ठिकाणी स्वीकारता यावीत, यासाठी एक कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर गोळा झालेली निवेदनं संबंधित विभागांमध्ये समाज कल्याण विभागामार्फत पोहचवली जातील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.