Advertisement

गोव्यात उघडपणे दारू पिण्यावर बंदी, वाचा नवी नियमावली

अलीकडेच पर्यटकांसाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

गोव्यात उघडपणे दारू पिण्यावर बंदी, वाचा नवी नियमावली
SHARES

अनेक जण कधी ना कधी गोव्याला गेले आहेत. गोवा अनेकांच्या फेवरेट डेस्टिनेशनच्या यादीत आहे. एखाद्याला परदेशी सहलीला कसे जायचे हे माहित नसेल तर ते आनंद घेण्यासाठी गोव्याला भेट देण्याचा बेत करतात. कारण गोव्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम, नृत्य गाणी, समुद्रकिनाऱ्यावरचा आनंद, मद्यपान, मौजमजा, सगळं काही करता येतं. त्यामुळे बहुतांश तरुण गोव्याचा प्लॅन करतात.

काही फिरण्याबरोबरच ड्रिंकचा आनंद घेण्यासाठीही गोव्यात येतात. कारण गोव्यात स्वस्तात मद्य मिळते असे सांगितले जाते. म्हणूनच लोक मित्रांसोबत एन्जॉय करतात आणि बीचवर बसून मद्य पिऊन पार्टी करतात. पण आता ते करू शकत नाही. कारण अलीकडेच पर्यटकांसाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन न केल्यास पर्यटकांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

जाणून घेऊया काय आहे नियम-

गोव्यातील दारूबंदीबाबत पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्याबद्दल जाणून घेणे पर्यटकांसाठी खूप महत्वाचे आहे. खरे तर पर्यटन विभागाने गोव्यात खुलेआम मद्यपानावर बंदी घालण्याबरोबरच स्वयंपाकालाही बंदी घातली आहे.

यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आले आहेत. पर्यटनाची क्षमता कमी होत असल्याकारणास्तव पर्यटन विभागाने हे सर्व केले आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार गोव्याबाहेर महाराष्ट्रातील मालवण आणि कर्नाटक राज्यातील कारवार या जलक्रीडा स्पर्धांसाठी अनधिकृत तिकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

इतकंच नाही तर गोव्यात खुल्या ठिकाणी अन्न शिजवण्यावर आणि समुद्रकिनाऱ्याच्या बाहेर दारू पिण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय कचरा पसरवणे, सार्वजनिकरित्या दारू पिणे, बाटल्या फोडणे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे पर्यटन क्षमता कमी होत आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. एवढेच नाही तर कठोर कारवाई होऊ शकते.



हेही वाचा

Mumbai Traffic Update: अंधेरीतील गोखले रोड पूल 'या' तारखेपासून वाहतुकीसाठी बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा