Advertisement

शाळा, कॉलेज, धार्मिकस्थळ, रुग्णालयाशेजारी नाले होणार पॉलिकार्बोनेट शेड बंदिस्त


शाळा, कॉलेज, धार्मिकस्थळ, रुग्णालयाशेजारी नाले होणार पॉलिकार्बोनेट शेड बंदिस्त
SHARES

मुंबईतील उघडे नाले बंदिस्त करण्याच्या नगरसेवकांच्या मागणीला नकार देत प्रशासनाने मुंबईतील नाले ‘पॉलिकार्बोनेट शेड’ने बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदिवली पश्चिम येथील पांचोलिया नाला आणि कांदिवली पूर्व येथील आशानगर नाला हा आता घुमटाकार आच्छादण्यात येणार आहे. एमएमआरडीएनंतर आता महापालिकेने पॉलिकार्बोनेट शेड उभारुन शाळा, कॉलेज, धार्मिकस्थळ आणि रुग्णालयाशेजारील नाले बंदिस्त करणार आहे.


नाले करणार बंदीस्त

मुंबईत दरवर्षी नाल्यांच्या सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु, नालेसफाई केल्यानंतरही झोपडपट्टी वस्त्यांत असलेल्या नाल्यांमध्ये वारंवार कचरा टाकला जात आहे. या उघड्या नाल्यांमुळे लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्यामुळे नाले पॉलिकार्बोनेट शेड अर्धवर्तुळाकार बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या नाल्यांमध्ये मनुष्यबळाचा वापर करून गाळ साफ केला जातो, असे नालेच अशाप्रकारे बंदिस्त केले जाणार आहे. तर ज्या नाल्यांमध्ये पोकलेन, जेसीबी उतरवतून सफाई केली जाते, असे नाले अशाप्रकारे बंदिस्त केले जाणार नाही, असं पर्जन्य जल विभागाचे प्रमुख अभियंता खंडकर यांनी सांगितलं. मात्र, अशाप्रकारे नाले बंदिस्त करण्याचे काम महापालिका पहिल्यांदाच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


'याला परवानगी द्या'

अशाप्रकारे नाले बंदिस्त करण्याची नगरसेवकांची तसेच विविध संस्थांची मागणी होती. त्यामुळे ही योजना राबवली जात असल्यामुळे प्रशासनाचे अभिनंदन करताना भाजपाचे मनोज कोटक यांनी २४ विभागातील २४ नाले निश्चित करून ते बंदीस्त केले जावेत, अशी सूचना केली. तसेच धार्मिक स्थळ, शाळा, कॉलेज आदी ठिकाणचे नाले बंदिस्त करण्यासाठी अनेक संस्थांकडून वारंवार मागणी होत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी अशा संस्थांना पॉलिकार्बोनेट शेडद्वारे नाले बंदिस्त करण्याची परवानगी विनाविलंब दिली जावी. जेणेकरून महापलिकेचा खर्चही वाचेल, अशी सूचना कोटक यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याला पाठिंबा देत अशाप्रकारे संस्था पुढे आल्यास त्यांना परवानगी देण्याची सूचना केली.

अनेक नाले हे नर्सिंग होम्स आणि रुग्णालय शेजारी असून या नाल्यांतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या शेजारी नाले बंदिस्त करण्याची सूचना भाजपाचे नगरसेवक पराग शहा यांनी केली. कांदिवलीतील पंचोलिया नाला हा आपल्या प्रभागात असून तो प्रथम बंदिस्त केला जात असल्यामुळे भाजपाच्या सुनीता यादव यांनी प्रशासनाचे आभार मानले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा